Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय घडामोडी“…तर आत्तापर्यंत सरकार कोसळलं असतं”, राहुल नार्वेकरांच्या ‘त्या’ विधानावर राऊतांचं टीकास्र!

“…तर आत्तापर्यंत सरकार कोसळलं असतं”, राहुल नार्वेकरांच्या ‘त्या’ विधानावर राऊतांचं टीकास्र!

ठाकरे गट व शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुनावणीचा वेग वाढवला आहे. दोन्ही बाजूंच्या आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस दाखल झाली असून त्यासंदर्भात अध्यक्षांसमोर सध्या सुनावणी चालू आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी रविवारी केलेल्या एका विधानाच्या उत्तरादाखल बोलताना संजय राऊतांनी नार्वेकरांना लक्ष्य केलं आहे. “तुम्ही बेकायदा सरकारचे रक्षक आहात”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते राहुल नार्वेकर?

राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रता सुनावणीसंदर्भात माध्यमांनी विचारणा केली असता सरकार पडणं किंवा टिकणं बहुमतावर अवलंबून असल्याचं ते म्हणाले होते. “सरकार पडणं किंवा टिकणं हे फक्त सभागृहातल्या बहुमतावर अवलंबून आहे. त्यामुळे कुणीही भविष्यवाणी केली, तर त्याकडे लक्ष देणं मला योग्य वाटत नाही. सरकारकडे संख्याबळ असेल तर सरकार टिकतं. ते संख्याबळ फक्त विधानसभेतच मांडता येतं. त्यामुळे विधानसभेत बहुमत नसेल, तरच सरकार कोसळू शकेल”, असं ते म्हणाले होते.

दरम्यान, राहुल नार्वेकरांच्या या विधानावर संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. “हे सरकार कधीच पडलं असतं. तुम्ही बेकायदा सरकारचे संरक्षक आहात. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने ‘राजकीय गप्पा कमी करा’ असे निर्देश दिले आहेत. तुम्ही संवैधानिक आणि निष्पक्ष पदावर बसले आहात. तिथे बसून तु्म्ही बेकायदा सरकारची वकिली करू शकत नाहीत. ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदललाय, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? जर तिथे कुणी संविधान मानणारी व्यक्ती बसली असती, तर आत्तापर्यंत हे सरकार कोसळलं असतं.

सरकार कधी जाणार हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहे हे सरकार कधी जाणार”, असं संजय राऊत म्हणाले.सरकार वाचवण्यासाठी विधानसभा अध्यक्षपदावर बसलेली व्यक्ती बेकायदा सरकारला संरक्षण देत आहे. काल ते म्हणाले की हे सरकार पडणार नाही. हे तुम्ही कशाला सांगताय? हे तुम्ही कसं ठरवणार? सरकारच्या ताटाखालची मांजरं बनून तुमच्यासारखी माणसं जोपर्यंत पदावर बसली आहेत, तोपर्यंत सरकार कसं पडेल? अशा लोकांमुळेच एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वास वाढतो”, असंही राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -