Wednesday, November 6, 2024
Homeक्रीडाआयपीएल २०२४च्या हंगामात कोण असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहित शर्मा की हार्दिक...

आयपीएल २०२४च्या हंगामात कोण असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहित शर्मा की हार्दिक पंड्या?

 

 

आयपीएल २०२४साठी, मुंबई इंडियन्सने आपला माजी खेळाडू हार्दिक पंड्याचा संघात परत समावेश केला आहे, जो गेली दोन वर्षे गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. हार्दिकबाबत असे मानले जात आहे की, तो रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून एमआयचा भावी कर्णधार असेल. मात्र, सध्या प्रश्न असा आहे की आयपीएल २०२४ मध्ये मुंबईचा कर्णधार कोण असेल? मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच आयपीएल चषक जिंकले आहेत. चेन्नई आणि मुंबईने संयुक्तरित्या पाच चषक जिंकले आहेत.

 

हार्दिक पंड्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात एमआय मधूनचं केली होती. २०२० मध्ये त्याने गुजरात टायटन्स या नवीन संघात सामील होण्यासाठी ही फ्रेंचायझी सोडली. जेव्हा या फ्रँचायझीने हार्दिकला कर्णधार बनवले तेव्हा हार्दिकनेही या फ्रँचायझीला निराश केले नाही आणि पहिल्याच सत्रात त्यांना चॅम्पियन बनवले. गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्या वर्षी हार्दिकच्या नेतृत्वाखाली अंतिम सामना खेळला, मात्र यावेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हार्दिकचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याने, एमआयमध्ये उपकर्णधार होण्यासाठी हार्दिकने गुजरातचे कर्णधारपद का सोडले? असे प्रश्न सध्या क्रिकेटवर्तुळात विचारले जात आहेत.

 

हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील करारात काय झाले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हे समजू शकते की जर कर्णधारपदाचा समावेश नसेल तर आयपीएल विजेते कर्णधार कोणताही करार स्वीकारत नाहीत. त्यामुळे रोहित शर्माचे कर्णधारपद जाणार का आणि त्याच्या जागी हार्दिक कर्णधार होणार का? यावर येत्या काही दिवसात संपूर्ण माहिती मिळेल.रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा चॅम्पियन्स बनवले

 

 

रोहित शर्मा पाच आयपीएल ट्रॉफीसह इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याच्या व्यतिरिक्त सीएसकेने एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली पाच आयपीएल खिताब जिंकले आहेत. विश्वचषक २०२३च्या फायनलमधील पराभवामुळे रोहितला कारकीर्द लांबवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. जरी तो विश्वचषकात विस्फोटक टी२० फलंदाजासारखा खेळला आणि १२०.९४च्या स्ट्राइक रेटने ५९७ धावा केल्या, तरीही आयपीएलचा विचार केल्यास मागील अनेक हंगाम त्याच्यासाठी फारसे चांगले राहिले नाहीत.गेल्या तीन आयपीएल हंगामात रोहित शर्माला केवळ तीन अर्धशतके झळकावता आली आणि २०१६ पासून त्याची फलंदाजीची सरासरी कधीही ३० एवढी कमी झाली आहे. मुंबई इंडियन्ससाठी तो चिंतेचा विषय आहे. रोहित शर्मा आपली टीम इंडियातील कारकीर्द पुढे सुरु ठेवण्यासाठी किमान एक फॉरमॅट सोडण्याचा तो विचार करत आहे. रोहित त्यामुळे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडण्याचा विचार करू शकतो. यामुळे त्याच्यावर कमी दडपण असेल आणि तो विश्वचषकाप्रमाणे आयपीएलमध्येही मुक्तपणे खेळू शकेल

 

हार्दिक पंड्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात एमआय मधूनचं केली होती. २०२० मध्ये त्याने गुजरात टायटन्स या नवीन संघात सामील होण्यासाठी ही फ्रेंचायझी सोडली. जेव्हा या फ्रँचायझीने हार्दिकला कर्णधार बनवले तेव्हा हार्दिकनेही या फ्रँचायझीला निराश केले नाही आणि पहिल्याच सत्रात त्यांना चॅम्पियन बनवले. गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्या वर्षी हार्दिकच्या नेतृत्वाखाली अंतिम सामना खेळला, मात्र यावेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हार्दिकचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याने, एमआयमध्ये उपकर्णधार होण्यासाठी हार्दिकने गुजरातचे कर्णधारपद का सोडले? असे प्रश्न सध्या क्रिकेटवर्तुळात विचारले जात आहेत.

 

 

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा चॅम्पियन्स बनवले

रोहित शर्मा पाच आयपीएल ट्रॉफीसह इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याच्या व्यतिरिक्त सीएसकेने एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली पाच आयपीएल खिताब जिंकले आहेत. विश्वचषक २०२३च्या फायनलमधील पराभवामुळे रोहितला कारकीर्द लांबवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. जरी तो विश्वचषकात विस्फोटक टी२० फलंदाजासारखा खेळला आणि १२०.९४च्या स्ट्राइक रेटने ५९७ धावा केल्या, तरीही आयपीएलचा विचार केल्यास मागील अनेक हंगाम त्याच्यासाठी फारसे चांगले राहिले नाहीत.

 

 

गेल्या तीन आयपीएल हंगामात रोहित शर्माला केवळ तीन अर्धशतके झळकावता आली आणि २०१६ पासून त्याची फलंदाजीची सरासरी कधीही ३० एवढी कमी झाली आहे. मुंबई इंडियन्ससाठी तो चिंतेचा विषय आहे. रोहित शर्मा आपली टीम इंडियातील कारकीर्द पुढे सुरु ठेवण्यासाठी किमान एक फॉरमॅट सोडण्याचा तो विचार करत आहे. रोहित त्यामुळे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडण्याचा विचार करू शकतो. यामुळे त्याच्यावर कमी दडपण असेल आणि तो विश्वचषकाप्रमाणे आयपीएलमध्येही मुक्तपणे खेळू शकेल.

हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्ससाठी गुजरात टायटन्सचे कर्णधारपद का सोडले?

 

आता प्रश्न असा आहे की, गुजरातने हार्दिक पंड्याला कर्णधारपद दिले होते, तोही चांगली कामगिरी करत होता. पण एमआयमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी त्याने गुजरातचा संघ का सोडला? यावर येत्या काही दिवसात कळेल. आयपीएल २०२४मध्ये हार्दिक पंड्या एमआयचे कर्णधारपद भूषवू शकत नसला अशी जरी शक्यता वर्तवली तरी, त्याने या हंगामाच्या शेवटी किंवा पुढील हंगामापासून या संघाचे कर्णधारपद स्वीकारले पाहिजे, असे फ्रेंचायझीचे मत आहे. स्वतःवरील दबाव कमी करण्यासाठी रोहित एमआयचे कर्णधारपद सोडू शकतो, त्यानंतर हार्दिकला ही जबाबदारी दिली जाऊ शकते आणि यामुळेच हार्दिकने गुजरातचे कर्णधारपद सोडले आहे. मात्र, ही सध्या फक्त एक चर्चा असून याबाबत ठोस अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -