Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगपूजा सावंतने दिली प्रेमाची कबुली? रिलेशनशीपचा केला खुलासा... कोण आहे स्पेशल व्यक्ती?

पूजा सावंतने दिली प्रेमाची कबुली? रिलेशनशीपचा केला खुलासा… कोण आहे स्पेशल व्यक्ती?

 

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. पूजाला आपण अनेक सिनेमा, वेबसिरीज. जाहिरातींमधून अभिनय करताना पाहिलंय. पूजा सावंतने आपल्या सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केलाय. पूजाच्या आयुष्यातील हा स्पेशल व्यक्ती आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय.

पूजा सावंतच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्ती कोण?पूजा सावंतने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर तीन फोटो शेअर केलेत. तिनही फोटोत पूजा एका तरुणाच्या मिठीत असुन त्याचा चेहरा दिसत नाहीय. हे फोटो पोस्ट करुन पूजा लिहीते, “माझ्या खास व्यक्तीसोबत एका नवीन अध्यायासाठी मी तयार आहे… ही आहे प्रेमाची जादू आणि आपल्या पुढच्या सुंदर प्रवासासाठी… आमच्या सोबत रहा.”असं कॅप्शन देत पूजा सावंतने हा खुलासा केलाय.पूजा सावंतच्या आयुष्यातील हा स्पेशल व्यक्ती कोण?पूजा सावंतने हे फोटो शेअर करत तिच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅनचा खुलासा केलाय. याशिवाय We Are Engaged असं लिहील्याने पूजाने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलंय.पूजा सावंतचा हा खास व्यक्ती आहे तरी कोण याची सर्वांना उत्सुकता आहे. पूजाने अजुन खुलासा केला नसला तरीही लवकरच तो कोण? हे सर्वांना स्पष्ट होईल. पूजाने हा खास खुलासा केल्याने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार तिचं अभिनंदन करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -