Friday, December 27, 2024
Homeअध्यात्मस्वामींचा वार गुरुवारी जर मठात किंवा मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच...

स्वामींचा वार गुरुवारी जर मठात किंवा मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच करा हे एक काम!

आपण सारे स्वामी सेवेकरी आहोत म्हणून आपण स्वामींच्या मंदिरात मठात आपण नियमित जात असतो परंतु आपण काही कारणास्तव किंवा दररोजच्या संपूर्ण गडबडीत जातो, नोकरी करणाऱ्या व्यक्तींना तर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाणे शक्यच होत नाही. त्यामुळे बरेच सेवेकरी उदास होतात. स्वामींचे दर्शन आपल्याला होणार नाही म्हणून नाराज होतात. परंतु अश्या सर्व स्वामीभक्तांनी अगदी घराच्या घरी एक हे काम नक्की करून पहा.

 

आपल्या देवघराजवळ जाऊन तिथे बसून राहायचे आहे, देवघरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीला आपण मुजरा करायचा आहे. आणि नमस्कार करून आपण त्या ठिकाणी बसून राहायचे आहे. जसे कि आपण मंदिरात गेल्यानंतर देवदर्शन घेतो आणि थोड्या वेळ आपण मंदिराच्या गाभाऱ्यात बसतो अगदी तसे मंदिरात असताना आपली नजर देवाकडे असते. आणि मूर्ती कडे आपण एकटक नजर लावून पाहत असतो. अगदी त्याचपद्धीत्ने देव्हाऱ्यासमोर शांत बसून आपण एकसलग स्वामींकडे पाहायचे आहे.

 

आपल्याला जेवढा वेळ आहे तेवढा वेळ बसू शकतो त्या बसण्याला कसलेही बंधन नाही. आपल्याला जितके वेळ बसने शक्य आहे तेवढा वेळ बसवा. त्यानंतर आपण स्वामी समर्थांचा जप देखील करायचा आहे. हा जप करण्यासाठी आपल्याकडे जपमाळ असणे आवश्यक आहे असे काही नाही. आपण हा जप अगदी आपल्या मनातल्या मनात देखील करू शकतो मित्रांनो हे काम आपण दररोज करणे शक्य नसेल तर एकदिवसाड किंवा तुम्हाला शक्य असेल तेव्हा त्यावेळी आपण हे काम करू शकतो.

 

तसेच ज्यावेळी आपल्या मनात येईल तेव्हा आपण हे काम करू शकतो, किंवा मंदिरात जाणार होतो मात्र काही कारणास्तव आपलयाला जाणे झाले नाही म्हणून मनाला खंत वाटून न घेण्यापेक्षा आपण घराच्या घरी स्वामींची सेवा करू शकता. व स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी म्हणून त्यांना प्रार्थना देखील घराच्या घरी करू शकता. केंद्रात गेल्यानेच स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती होईल असे काहीच नाही. फक्त मनात श्रद्धा ठेवून वरती सांगितल्याप्रमाणे जर आपण हे काम घराच्या घरी केले तर आपल्यावर नक्कीच स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील.

 

तर मित्रांनो अश्या प्रकारे आपण वेळोअभावी जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही हे काम करायचे आहे. मित्रांनो अशा आहे कि आजचा लेख तुम्हाला आवडला असेल. जर लेख आवडला असेल तर तो नक्कीच तुमच्या मित्रांना शेयर करा. तसेच कंमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहण्यास विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -