Thursday, December 26, 2024
Homeब्रेकिंग10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या पॅटर्नमध्ये होणार मोठे...

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या पॅटर्नमध्ये होणार मोठे बदल

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या पॅटर्नमध्ये होणार मोठे बद

 

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता लवकरच इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठे बदल होणार आहेत.नव्या परीक्षा पॅटर्ननुसार, दिवाळीआधी एक सत्र, मार्चमध्ये दुसरे सत्र आणि अंतिम सत्र पूर्ण करण्यात येईल. या नवीन पद्धतीची अंमलबजावणी 2024-25 वा 25-26 अशा शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यात येईल. याबाबतची माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

 

नुकतेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानंतर आता दहावी बारावीच्या परीक्षेचा पॅटर्न देखील बदलणार असल्याचे समोर येत आहे. विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावीचे वर्ष सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे बहुतांशा विद्यार्थी या वर्षांमध्ये अभ्यासाचा अधिक ताण घेतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा विचार करूनच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षेचा सेमिस्टर पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मंत्रालयाने विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळांची मते देखील मागून घेतली आहेत.

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालय त्यांना मिळालेल्या उत्तरातून येत्या दोन वर्षात परीक्षा पॅटर्न बरोबर अभ्यासक्रम पूर्णपणे बदल करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण देखील कमी होईल. नव्या अभ्यासक्रमानुसार, शैक्षणिक मंडळ मनोरंजक आणि समर्पक असा मजकूर विद्यार्थ्यांसाठीउपलब्ध करून देईल. तसेच विद्यार्थ्यांना वैचारिक बनवण्यासाठी देखील नव्या पॅटर्नमधून प्रयत्न करण्यात येईल. याचा फायदा थेट विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करताना होईल. तसेच यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास करण्याची रुची देखील वाढेल.

 

दरम्यान, नव्या परीक्षा पद्धतीनुसार दहावी बारावीच्या परीक्षेचे पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेतले जाईल तर दुसरे सत्र मार्च महिन्यात घेण्यात येईल. या दरम्यानच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा देखील घेतल्या जातील त्यानंतर दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्र करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या सत्राचे गुण पाहायला मिळतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -