Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगआता Phone Pay देणार पर्सनल लोन

आता Phone Pay देणार पर्सनल लोन

 

फोन पे आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन सुविधा आणत असते. आता पुन्हा एकदा फोन पे नवीन वर्षात अशीच एक सुविधा सेवेत आणण्याचा विचार करत आहे. फोन पे आपल्या ग्राहकांसाठी पर्सनल लोन ही सेवा सुरू करणार आहे.2024 मध्ये फोन पेचा वापरकर्त्यांना या सेवेचा फायदा घेता येईल. ही सेवा सुरू करण्यासाठी गुगल पे ला पाच बँका आणि NBFC ने आपली सहमती दर्शवली आहे.

 

सध्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात फोन पे कंपनीने आपली चांगली पकड निर्माण केली आहे त्यामुळे आता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये देखील आपली जागा निर्माण करण्याचा विचार फोन पे कंपनी करत आहे. यापूर्वी फोन पे ने जीवन, आरोग्य, मोटार आणि कार विमा अशा पॉलिसी सेवा आपल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आता फोन पे कंपनी लोन सेवा देखील सुरू करण्याचा विचार करत आहे. या सेवेमुळे एखाद्या गरजू व्यक्तीला लगेच फोन पे वरून लोन घेता येईल.

 

यासाठी फोन पे कंपनी आपल्या ग्राहक डेटाबेसमधून अशा लोकांचा शोध घेत आहेत जे विविध कर्जासाठी पात्र आहेत. पुढे जाऊन कंपनी अशा लोकांना लोनसंदर्भात ऑफर दिली. अद्याप या लोन संदर्भात मर्यादा ठरवण्यात आली नसली तरी काही विशिष्ट लोकांनाच या लोनचा फायदा घेता येईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे 2024 मध्ये कोणते ग्राहक फोन पे लोनसाठी पात्र ठरतील हे कंपनी कडूनच घोषित करण्यात येईल.दरम्यान, फोन पे कंपनीने आपल्या पन्नास कोटीहून अधिक ग्राहकांना विमा पॉलिसी विकली आहे. या विमा पॉलिसीमध्ये कार विमा, आरोग्य विमा अशा विविध विमांनाचा समावेश आहे. यासाठी कंपनीने ACKO सह अनेक कंपन्यांशी करार केला आहे. या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत तर कंपनीने 56 लाख पॉलिसी विकल्या आहेत. आता कंपनी आपल्या ग्राहकांना लोन देण्याचा देखील विचार करत आहे. 2024 साली कंपनीकडून लोन सेवा सुरू करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -