Tuesday, April 23, 2024
Homenews19 वर्षीय तरुणीची दत्तमंदिरात गळफास घेऊन आत्महत्या...

19 वर्षीय तरुणीची दत्तमंदिरात गळफास घेऊन आत्महत्या…

राजगुरूनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 19 वर्षीय तरुणीने दत्त मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव अक्षदा अर्जुन वाळुज असे आहे. या तरुणीने नेमकी आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झाले नाही. मुलीचे वडील अर्जुन विठ्ठल वाळुज यांनी खेड पोलिस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे.

मृत तरुणी आणि तिची बहीण वेताळे येथून राजगुरुनगर शहरात संगणकक्लास साठी येत होत्या. क्लास संपल्यानंतर दोघी बहिणी वेताळे येथे जाण्यासाठी एसटी बसस्थानकात आल्या. दरम्यान अक्षदा हि राजगुरुनगर शहरात जाऊन येते असे सांगून गेली. मात्र ४ तास वाट पाहूनही अक्षदा परत आली नाही.

यानंतर अक्षदाचा तपास केला असता भिमानदी काठी नवीन पुलाजवळ दत्त मंदिरात लोखंडी अंगलला ओढणीने अक्षदा हिने फाशी घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ओळख पटवून घरातील कुटुंबाला याची कल्पना दिली. अक्षदाने आत्महत्या केली कि तिची हत्या झाली हे अजून समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षा राणी घाटे करित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -