Friday, March 14, 2025
Homeइचलकरंजीओव्हरलोड वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष! अपघाताच्या प्रमाणात वाढ

ओव्हरलोड वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष! अपघाताच्या प्रमाणात वाढ

इचलकरंजी शहरात सर्रासपणे लहान-मोठ्या रस्त्यावर ओव्हरलोड केलेली वाहने सर्रासपणे दिसून येतात. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे बऱ्याचवेळा वाहतुक कोंडीसह अपघातही घडत असतात. या ओव्हरलोड वाहतुकीकडे वाहतुक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. ओव्हरलोड वाहतुक करणाऱ्या वाहनांना अभय काय दिले जाते, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

 

इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून परिचित आहे. शहर परिसरात वस्त्रोद्योगासह इतर लहान-मोठ्या उद्योगांची संख्या लक्षणीय आहे. इचलकरंजी शहरात अशी ओव्हरलोड केलेली वाहने सर्रासपणे दिसून येतात. त्याचे टिपलेले छायाचित्र. करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. बरेच वाहनधारक नियमांपेक्षा जादा माल भरून वाहतूक करताना दिसतात. ओव्हरलोड वाहतुक करणारे तीनचाकी, चारचाकी वाहने लहान-लहान रस्त्यांसह शहरातील मुख्य रस्त्यांवरून ये-जा करताना दिसत असतात.

 

नियमबाह्य वाहतुकीमुळे शहर परिसरातील अनेक रस्त्यांवर वारंवार वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. तर कक्षाकडून दुचाकी, तीनचाकी वाहनांवर नियमांचे उल्लंघन केल्यानंतर कारवाई करताना दिसून येतात. तसेच चुकीच्या ठिकाणी पार्किंग केलेली वाहने क्रेनच्या माध्यमातून त्यांच्यावर दंडाची कारवाई केली जाते. मात्र, ओव्हरलोड करून जाणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही, असे नागरिकांतून बोलले जात आहे. हा दुजाभाव का? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. तेव्हा शहर वाहतूक शाखेने – ओव्हरलोड करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागशी नागरिकांतून होत आहे.

 

वाहनाची क्षमता नसतानाही क्षमतेपेक्षा दुप्पट, तीप्पट माल भरून शहरातील विविध रस्त्यावरून वाहतूक करताना वाहने दिसतात. रस्त्यावरून इतर वाहनांबरोबर पादचारी, शाळकरी मुले ये-जा करीत असतात. त्यातच ही ओव्हरलोड वाहने शहरातील अंतर्गत रस्त्यावरूनही फिरत असतात. अशावेळी एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा अशा वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -