Sunday, December 22, 2024
Homeसांगलीसांगली जिल्ह्याला 'अवकाळी'चा तडाखा; द्राक्षबागांना मोठा फटका!

सांगली जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा; द्राक्षबागांना मोठा फटका!

सांगली शहरासह जिल्हाभरात काल (बुधवार) पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या.

 

रात्री आठनंतर पाऊणतास झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले. रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. रात्री उशिरापर्यंत सरी कोसळत होत्या.

 

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने (Meteorology Department) पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार आज दिवसभर सूर्यदर्शन क्वचितच झाले. दुपारनंतर हवेत गारवा होता. सायंकाळी प्रारंभी थोडावेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री आठनंतर सुरू झालेला पाऊस थांबून-थांबून सुरूच होता. त्यामुळे गावभाग, विश्रामबाग, पेठभाग, वखारभागातील रस्त्यांवर पाणी साचले होते.

 

सखल भागात साचलेल्या पाण्याने तळे निर्माण झाल्याचे दिसत होते. प्रामुख्याने मारुती चौक, स्टेशन रोडसह सिव्हिल रोडवर साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची कसरत सुरू होती. हातगाडे, तसेच किरकोळ व्यवसाय ठप्प झाला होता. बिगरमोसमी पावसाने शहरातील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

 

दरम्यान, जिल्हाभरात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतीचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. विशेषतः द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हबकला आहे. रब्बी हंगामातील पिकांचेही जोरदार पावसाने नुकसान झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -