मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना येथे आज सभा होणार आहे. या सभेपूर्वी जालन्यात मुसळधार पाऊस झाला. सभास्थळी चिखल झाला आहे. यामुळे ही सभा कशी होणार? यावर चर्चा सुरु असताना मनोज जरांगे पाटील यांनी सभा होणारच असल्याचे स्पष्ट सांगितले. पाऊस म्हणजे आम्हाला आशीर्वाद आहे. मुसळधार पाऊस असो की कडक ऊन असो, मराठे सभेला येणार आहे. त्याठिकाणी चिखल झाला तरी मराठे सभेला येणार आहे आणि सभा यशस्वी होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.पुष्पवृष्टीवर टीका मनोज जरांगे म्हणाले….
जालन्यात होणाऱ्या सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची शहरातून भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर 130 जेसीबीमधून फुलांचा वर्षाव केला जाणार आहे. त्यावर विरोधकांनी बोट ठेवले. त्याला मनोज जरांगे यांनी जोरदार उत्तर दिले. मराठा समाजातील 32 लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या. म्हणजे मराठा समाजातील 32 लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. त्यांना आरक्षण मिळाल्याच्या आनंदामुळे पुष्पवृष्टी केली जात आहे. फुले उधळली जात आहे. त्यांना हे दिसत नाही का? तुझे डोळे गेले का? असे त्यांनी म्हटले आहे.
मंत्रीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवताय
मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा उत्तर महाराष्ट्रात होत आहे. उत्तर महाराष्ट्र छगन भुजबळ यांचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही का? असा प्रश्न विचारले असता भुजबळ म्हणाले की, मंत्रीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहे. भुजबळांना सरकार रोखत नाही. नारायण राणेही टीका करत आहे. सरकारचे त्यांना पाठबळ असल्याचा संशय आम्हाला आहे.भुजबळ विरुद्ध जरांगे
मनोज जरांगे यांच्या सभांमध्ये आता मुळ मुद्दा हरवला आहे. तो मागे पडत असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ यांचे दोन, चार लोकच हे काम करत आहे. भुजबळ आणि विरोधक जे काही बोलत आहे, त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. आम्ही बोललो नाही तर हे कोमात जातील. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करावे लागते, असा टोला त्यांनी लगावला.