Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय घडामोडीकाल राजीनामा दिला, आज शरद पवारांच्या भेटीला; मराठा आरक्षणावरून मागासवर्ग आयोगात मतभेद?

काल राजीनामा दिला, आज शरद पवारांच्या भेटीला; मराठा आरक्षणावरून मागासवर्ग आयोगात मतभेद?

 

 

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचे निकष अंतिम झाले असून, सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान, आयोगाचे सदस्य बालाजी सागर किल्लारीकर यांनी सर्वच जातींचे मागासलेपण तपासावे, अशी मागणी लावून धरून आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काल राजीनामा देणारे किल्लारीकर आज सकाळीच शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला पोहचले आहे.

 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा देणारे बी.एल. किल्लारीकर शरद पवार यांच्या भेटीला पोहचले आहे. काल आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर किल्लारीकर आज शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहचले असल्याने चर्चांना उधाण आले आहे. जातनिहाय जातगणना तसंच जातींचे सामाजिक मागासलेपण तपासावे, अशी किल्लारीकरांची मागणी आहे. मात्र, त्यावर मतऐक्य न झाल्याने काल किल्लारीकर यांनी राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर किल्लारीकर माध्यमांशी बोलणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

 

मागासवर्ग आयोगाचे सदस्य धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे व लक्ष्मण सोपान हाके हे आयोगाच्या कामकाजासाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येताहेत. हे सदस्य विविध जातींच्या संदर्भात क्षेत्रपाहणी करणार आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचे हे सदस्य परवा (4 डिसेंबर) रोजी सायंकाळी 5 वाजता शहरात दाखल होतील. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता उमरगा शहर व चिंचकोट येथे ते क्षेत्रपाहणी करतील. यानंतर हे पथक सकाळी 11 वाजता लोहारा तालुक्यात फणेपूर व बेलवाडी येथे जातील. येथील पाहणीनंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील किलज व होर्टी येथे क्षेत्रपाहणी करतील. दुपारी 1 वाजता तुळजापूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी दीड वाजता श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील. दुपारी 3 वाजता सभागृहात सर्व उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. यानंतर आयोगाचे सदस्य शिक्षक संवर्गाच्या इतर मागासवर्ग बिंदू नामावली व जिल्हाबदली संदर्भात आढावा घेतील. बैठका आटोपल्यानंत साधारपणे सायंकाळी सात वाजता तुळजापूरहून सोलापूरकडे प्रयाण करतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -