Friday, November 22, 2024
Homeसांगलीसांगली : अवकाळी पावसाची रात्रपाळी

सांगली : अवकाळी पावसाची रात्रपाळी

 

 

अवकाळी पावसाने तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ आणि पलूस या चार तालुक्यांत रात्रभर धिंगाणा घातल्याने द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. मांजर्डे (ता. तासगाव), अंकलखोप (ता. पलूस) आणि बुधगाव (ता.मिरज) या ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पावसाची नोंद झाली. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २१.१ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस पलूस तालुक्यात झाला.

 

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून गुरुवारी रात्री तर चार तालुक्यांत अवकाळीने थैमानच घातले. रात्रभर पडणार्‍या पावसाने द्राक्ष बागा, उस व भाजीपाल्याचे फड, ज्वारी, गहू या पिकात गुडगाभर पाणी साचले असून हंगामात भरून न वाहिलेले नाले सकाळी तुडुंब भरून वाहत होते.अंकलखोप, भिलवडी, नागठाणे परिसरात रात्रीमध्ये ६४.५ मिलीमीटर पाऊस झाला असून मांजर्डे (ता.तासगाव) आणि बुधगाव (ता. मिरज) येथे ६२.३ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात सरासरी २१.१ मिलीमीटर पाऊस गुरुवारी रात्री झाला असून तालुकानिहाय पाऊस असा मिरज २८, जत ४.४, विटा २७.१, वाळवा १७.५, तासगाव ३८.२, शिराळा ५.८, आटपाडी १०.५, पलूस ४० आणि कडेगाव २३.१ मिलीमीटर.अवकाळी पावसाने मिरज पूर्व भाग, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ या द्राक्ष पट्ट्यात मोठी हानी झाली असून फुलोर्‍यात असलेले घड कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर आगाप छाटणी झालेल्या बागेतील मणी तडकण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे यंदा हातातोंडाला आलेले पिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून दमट हवामानामुळे दावण्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच तयार द्राक्षातील साखर रिव्हर्स जाण्याची लक्षणे दिसत असून यामुळे गोडीवर परिणाम होणार आहे. पलूस तालुक्यात तोडणीला आलेल्या उसाचेही नुकसान होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -