Friday, November 22, 2024
Homeराजकीय घडामोडीइकडे निवडणुकीची धामधूम, तिकडे मुख्यमंत्री धारावीत, एकनाथ शिंदेंनी स्वत: रस्ते धुतले!

इकडे निवडणुकीची धामधूम, तिकडे मुख्यमंत्री धारावीत, एकनाथ शिंदेंनी स्वत: रस्ते धुतले!

 

 

मिनी लोकसभा म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल (4 states results) जाहीर होत आहे. एकीकडे ही धामधूम सुरु असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे स्वच्छ मुंबई मोहिमेत व्यस्त असल्याचा पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांनी सकाळी सकाळी सातच्या सुमारास मुंबईतील धारावी (CM at Dharavi) या ठिकाणी जाऊन स्वच्छ मुंबई मोहिमेचा (Clean Mumbai) शुभारंभ केला. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: रस्त्यावर पाणी मारुन रस्ते स्वच्छ केले.

 

स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात व्‍यापक स्‍तरावर संपूर्ण स्‍वच्‍छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्‍याचे नियोजन केले आहे.या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.

 

सायन रूग्णालयात फिरून पाहणी (CM Eknath Shinde visits Sion Hospital)

मुख्यमंत्र्यांनी आधी शीव (सायन) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (सायन हॉस्पिटल) येथील प्रवेशद्वार क्रमांक ७ जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सायन रूग्णालयात फिरून वैद्यकीय सेवेच्या सज्जतेची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

 

CM Eknath Shinde Dharavi Visit Today : मुख्यमंत्र्यांनी स्वत: रस्ते धुतले

दरम्यान, धारावी इथं मुख्यमंत्र्यांनी नालेसफाईची पाहाणी करत पायी मार्गस्थ झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत स्वत: रस्त्यावर पाणी मारुन रस्ते स्वच्छ केले. मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करत होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पाईप हातात घेऊन, रस्त्यांवर पाणी मारलं.

 

CM Eknath Shinde Dharavi Visit Today : मुख्यमंत्री काय म्हणाले?

सायन रुग्णालयच्या आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये पाहणी केली. 200 ICU आणि एक हजार बेड वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन हजारापेक्षा जास्त बेड वाढवले जातील. सहा महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल. सोनोग्राफी मशीन, डायलिसिस युनिट वाढवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर रुग्णालयाची स्वच्छता यावर भर देण्यास सांगितलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath SHinde) म्हणाले.

 

दुसरा विषय मुंबईची स्वच्छता आहे. आज डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता इथून त्याची सुरुवात झाली आता धारावीमध्ये अनेक जे आपले 24 विभाग आहेत, या 24 विभागांमध्ये शनिवार आणि रविवार किंबहुना आठवड्यातून एकदा करण्याचा प्रयत्न आपला आहे, म्हणजे मॅनपावर जी आहे या रस्त्यावर दोनशे लोक काम करतात, शंभर लोक काम करतात. तेवढ्यावर अवलंबून न राहता आजूबाजूचे चार पाच वॉर्ड एकत्र करून त्यांची सगळी मॅनपावर या संपूर्ण परिसरामध्ये एकत्र करून रस्ते स्वच्छ करणे त्याच्यावरती माती काढणं, सफाई करणं गटर सफाई करणे, हे काम सुरु आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath SHinde) म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -