Sunday, December 22, 2024
Homeसांगलीसांगली : माहुलीतील चोरीप्रकरणी संशयितास विटा पोलिसांकडून अटक

सांगली : माहुलीतील चोरीप्रकरणी संशयितास विटा पोलिसांकडून अटक

 

 

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या १७ नोव्हेंबर रोजीच्या माहुलीतील रॅलीत गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या नगर जिल्ह्यातील एका संशयितास विटा पोलिसांनी आज शनिवारी जेरबंद केले.संजय रामु माने (वय ३९, रा. नाथनगर, पाथर्डी ता.पाथर्डी) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून तब्बल चार लाखांच्या ६८ ग्रॅमच्या २सोनसाखळ्या जप्त केल्या आहेत. याबाबत लालासाहेब नारायण माने यांनी फिर्याद दिली होती.

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की,गेल्या महिन्यात माहुली गावात सकाळी ९.४५ वा.च्या सुमारास माहुली ते विटा रस्त्यावर बसस्थानका शेजारी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण रॅली झाली. यावेळी मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेऊन लालासाहेब माने यांच्या गळ्यातील एक ५२ ग्रॅम ची आणि दुसरी १६ ग्रॅम वजनाच्या अशा दोन सोनसाखळ्या चोरीला गेल्या होत्या. याबाबत गावातील लालासाहेब माने यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.या चोरीच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे अन्वेषन पथकातील मधील पोलीस कॉन्स्टेबल संभाजी सोनवणे यांना टीप मिळाली की, नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील संजय माने याने ही चोरी केली आहे.

 

त्यामुळे विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाथर्डी येथे जावून सापळा रचून या संशयितास ताब्यातघेतले. यावेळी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर त्यास ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्यात आणले आणि अटक करून पोलीस कोठडीत ठेवले असता संशयित संजय माने याने विटा आणि तासगाव येथील चोऱ्यांची कबुली दिली आहे. ही कार वाई पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलिस अधीक्षक रीतु खोकर, पोलिस उपअधी क्षक पद्मा कदम, पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, अजय पाटील यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -