कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काँग्रेसनं आश्वासनं दिली पण ती पूर्ण केली नाहीत, त्यामुळे येत्या काळात जनतासुद्धा काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) केली. घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता ‘मन मन मोदी’ असे निकाल लागलेत, मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, घर घर मोदी म्हणायचे आता मन मन मोदी असे निकाल आता लागले आहेत. मोदींचा करिष्मा संपला असं काही लोक म्हणत होते. मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जनतेनं या निवडणुकांमध्ये मोदींना साथ दिली. मोदींचा करिष्मा, लोकांमध्ये असलेली लोकप्रियता ते लोकप्रियतेत एक नंबरवर आहेत हे पुन्हा सिद्ध झालं. राहुल गांधींनी परदेशात देशाला बदनाम केलं . मोदींना हरवण्यासाठीइंडिया आघाडी एकत्र आली आहे. 2024 मध्ये इंडिया आघाडीचे पानिपत होईल.
राहुल गांधीनी देशात भारत जोडो आणि परदेशात भारत तोडो यात्रा केली : मुख्यमंत्री
नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले काम आणि अमित शाह यांनी केलेल्या नियोजनामुळे एनडीएला मोठे यश मिळाले आहे. घर घर मोदी मन मन मोदी असा निकाल आपण पाहिला. हा निकाल जनतेच्या हातात असतो, आणि जनतेने मोदींना साथ दिली. मोदी जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली पण भारताबाहेर जाऊन त्यांनी भारत तोडो यात्रा केली.
जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्री
राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. कर्ज माफ करू असे आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही. कर्नाटकमध्ये देखील असे आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही त्यामुळे येणाऱ्या काळात देखील जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आगामी निवडणुकांमध्ये आघाडीचे पानीपत होणार : मुख्यमंत्री
2014 मध्ये मोदींवर नको नको ते आरोप केले पण मोदी निवडून आले. 2019 मध्ये चौकीदार चोर आहे असे आरोप केले पण मोदी निवडून आले . आता मोदींविरधात देखील इंडिया आघाडी एकत्र आली आहे पण मोदी निवडून येतील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे पानीपत होणार आहे.