भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीवर बोलताना बावनकुळे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.