Wednesday, November 6, 2024
Homenewsनारायण राणे महाड पोलिसांच्या ताब्यात.

नारायण राणे महाड पोलिसांच्या ताब्यात.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी आज (दि. २४) दुपारी नारायण राणेंवर अटकेची कारवाई केली.


रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आता महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राणे यांच्या अटकेनंतर या प्रकरणी घडामोडी वेगाने घडत असून महाड पोलिस नारायण राणे यांना घेऊन महाडकडे रवाना झाले आहेत. राणे यांना आज संध्याकाळी किंवा उद्या महाडच्या न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांच्याविरोधात सर्वात प्रथम नाशिक आणि नंतर महाड, ठाणे, पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान जन आशीर्वाद यात्रेत असणाऱ्या नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलिस अधीक्षक पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दुपारी ३:५० वाजता अटक करण्यात आली. त्यानंतर महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती कोकण उप महानिरीक्षक नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
कोकण उप महानिरीक्षक संजय मोहिते हे सकाळपासून रत्नागिरीत दाखल झाले आहेत. महाड पोलिसांच्या ताब्यात मंत्री राणे यांना देण्याआधी रायगड एसपी अशोक दुधे यांच्याशी कोकण उप महानिरीक्षक संजय मोहिते यांनी कायदा व सुव्यवस्थाबाबत सविस्तर चर्चा केली.


त्यानंतर त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्यास्थित रत्नागिरी, नाशिक, रायगड, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा पोलिस महासंचालक कार्यालयातील कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी आढावा घेत आहेत. शिवाय सर्व अधीक्षक आणि आयुक्तायाच्या नियंत्रण कक्षेतून परिस्थितीची माहिती मागविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -