Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू,

ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू,

 

शहरातील सुरत बायपास रोडवर पुढे चालणाऱ्या सायकलस्वारास मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वार जखमी होऊन मृत झाला. हा अपघात रविवारी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास घडला.याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मोहन मंगल अहिरे (वय ५३) हे रविवारी रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सायकलने बायपास रोडने जात होते. त्याचवेळी सेवादास मंदिराजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र. आरजे १९-जीएच ३६७२) त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात मोहन अहिरे हे गंमीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला. याबाबत रवींद्र अहिरे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय दंडिले करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -