येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असेल यासाठी जातकांकडून तयारी सुरु आहे. ग्रहांची साथ मिळेल का? त्यात पापग्रह असलेला शनिदेव कशी फळं देईल, इथपर्यंत विचार केला जात आहे. प्रत्येक ग्रहाचा तसा पाहिला तर राशीचक्रावर परिणाम होत असतो. थोड्या अधिक प्रमाणात प्रत्येक जातकांना शुभ अशुभ फळं भोगावी लागतात. वैयक्तिक कुंडलीतील ग्रहमान आणि गोचर काळात ग्रहाची स्थिती यामुळे जातकांवर परिणाम होत असतो. त्यात पापग्रह असलेल्या शनि, राहु-केतुची स्थिती महत्त्वाची आहे. तसं पाहिलं तर 2024 या वर्षात शनिदेव राशीबदल करणार नाहीत. कुंभ राशीतच शनिचं ठाण असणार आहे. या दरम्यान वक्री, अस्त-उदय आणि नक्षत्र परिवर्तन अशी स्थिती असेल. त्यामुळे जातकांना कमी अधिक प्रमाणात फटका किंवा फायदा होऊ शकतो. शनिदेव 2024 मध्ये शतभिषा नक्षत्रातून भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळेल.
या राशीच्या जातकांना मिळणार लाभ
मेष : शनिदेवांना भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करताच या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. कारण कुंभ राशीतील शनिदेव या राशीच्या उत्पन्न स्थानात आहे. त्यामुळे 2024 या वर्षात उत्पन्नात जबरदस्त वाढ होईल. काम करत असलेल्या क्षेत्रात मनासारख्या घडामोडी घडतील. जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. कौटुंबिक स्तरावर आनंदाचं वातावरण राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.
वृषभ : कुंभ राशीत स्थित असलेले शनिदेव या राशीच्या दशम म्हणजेच कर्मस्थानात गोचर करत आहे. नक्षत्र बदल करताच या राशीच्या जातकांनाही लाभ मिळेल. 2024 या वर्षात आतापर्यंत कामात आलेल्या अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना विशेष लाभ मिळेल. मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या इन्क्रिमेंटमध्ये फायदा होईल. त्यामुळे आर्थिक गणितं सुटतील. मोठ्या पदावर नियुक्ती होऊ शकते. राजकारणातील लोकांना लाभ मिळेल.
सिंह : कुंभ राशीतील शनिदेव या राशीच्या सप्तम भावात गोचर करत आहे. त्यामुळे नक्षत्र बदल होताच निश्चित लाभ मिळेल. कौटुंबिक पातळीवर बरेच बदल पाहायला मिळतील. वैवाहिक जीवनात बरेच सकारात्मक बदल होतील. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. अध्यात्मिक कार्यात मन रमेल. जीवनात सुख समृद्धी वाढेल. वाहन आणि प्रॉपर्टीचं सुख प्राप्त होईल.