Tuesday, August 26, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीतील १३३ अंगणवाड्या बंद

इचलकरंजीतील १३३ अंगणवाड्या बंद

 

विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मंगळवारपासून बेमुदत संपावर गेल्याने कोल्हापूर – इचलकरंजी नागरी प्रकल्प अंतर्गत इचलकरंजीतील १३३ आणि हुपरीतील ३६ अशा १६९

अंगणवाड्यातील कामकाज ठप्प झाले आहे. इचलकरंजी व हुपरीतील एकूण १६६ अंगणवाडी सेविका आणि १६७ मदतनीस या संपात सहभागी झाल्या आहेत.

 

किमान वेतन कायद्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना २६ हजार आणि मदतनीसांना १८ हजार रुपये पगार मिळावा, आवश्यक ते सर्व लाभ मिळावेत, महागाई भत्त्याला जोडूनच मानधनातील वाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता.

 

प्रदीर्घकाळापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सातत्याने शासन दरबारी प्रयत्न केले जात आहेत. विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला लेखी स्वरुपात निवेदनेही दिली जात आहेत. परंतु मागण्यांची पूर्तता केली जात नसल्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने ४ डिसेंबरपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे.

 

 

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून ६ महिने ते ३ वर्षांची बालके, ३ ते ६ वर्षांची बालके, गर्भवती महिला, स्तनदा माता यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे काम केले जाते. १६९ अंगणवाड्या अंतर्गत सध्या ६ महिने ते ३ वर्षापर्यंतची ५९६२ बालके, ३ ते ६ वर्षांपर्यंतची ५८९२ बालके, १०१२ गर्भवती महिला आणि १०२५ स्तनदा माता विविध योजनांचा लाभ घेत आहेत. तर आता संपामुळे त्यामध्ये अडचणी आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -