आपलं स्वत:च्या मालकीचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्या घर किंवा फ्लॅट घेणं अगदी सोपं झालं आहे. बँकांकडून सहज होम लोन मिळतं, ज्यामुळे हे काम सोपं होऊन जातं. आपल्या देशात घर विकत घेणे हा मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठा निर्णय असतो. बहुतेक लोक कर्ज काढून घर खरेदी करतात आणि आयुष्यभर EMI च्या जाळ्यात अडकून जातात. Home Loan
कर्ज घेऊन घर विकत घेणं की भाड्याने राहणं?
घर घेणं महत्त्वाचं असलं तरी, कर्ज घेऊन घर घेणे हा योग्य निर्णय आहे का? हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का, असेल तर याचं उत्तपर जाणून घ्या. कर्ज घेऊन घर किंवा सदनिका खरेदी करण्याचा व्यवहार फायदेशीर नसून तोट्याचा आहे. जेव्हा लोक कर्ज घेऊन घर विकत घेतात तेव्हा ते ईएमआय (EMI) मध्ये बांधले जातात. कारण देशातील बहुतांश लोक किमान 20 वर्षांसाठी गृहकर्ज घेतात. हा व्यवहार कशाप्रकारे तोट्याचा आहे आणि हे टाळण्यासाठी काय करावं लागेल, जाणून घ्या.
काय अधिक फायदेशीर?
देशातील बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबे 2BHK फ्लॅट खरेदी करतात, विशेषतः मेट्रो शहरांमध्ये हा ट्रेंड आहे. 2BHK फ्लॅटची किंमत शहरांनुसार ठरवली जाते. जर आपण मुंबई, दिल्लीसारख्या शहरात 2BHK फ्लॅटची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे. यासाठी ग्राहकाला 15 टक्के रकमेपर्यंत डाऊन पेमेंट करावं लागतं. म्हणजेच 5 ते 6 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करावं लागेल. यानंतर मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि ब्रोकरेज स्वतंत्रपणे आकारले जातात. नवीन घर खरेदी करताना, अनेकदा नवीन फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू देखील खरेदी केल्या जातात, ज्यावर अंदाजे 4 लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. या सर्वांचा विचार केला तर घरात पाऊल ठेवण्यापूर्वीच 10 लाख रुपये खर्च झालेले असतात.
समीकरण जाणून घ्या? Home Loan:
सुमारे 40 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करण्यासाठी एखादा व्यक्ती 5 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करते आणि उर्वरित 35 लाख रुपयांचे गृहकर्ज घेते. सध्या क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास 9 टक्के व्याजदराने होम लोन उपलब्ध आहे. 9 टक्के व्याजावर आधारित, 20 वर्षांसाठी 35 लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी 31,490 रुपये EMI आहे. याशिवाय डाउन पेमेंट आणि इतर गोष्टींवर तुम्हाला सुमारे 10 लाख रुपये खर्च करावे लागतील.
भाड्याने राहत असाल तर होईल फायदा
जर तुम्ही तोच फ्लॅट भाड्याने घेतला तर, तुम्हाला दरमहा 15,000 रुपये भाड्याने सहज मिळेल. त्यामुळे दर महिन्याला तुमच्याकडे 16 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत होईल. आता हा पैसा चांगल्या ठिकाण आणि योग्य रितीने गुंतवला तर करोडो रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. चांगला परतावा मिळण्यासाठी गुंतवणुकीचे अनेक हमी असणारे चांगले पर्याय उपलब्ध आहेत.
SIP मधून उत्तम परतावा
कमी प्रयत्नात जास्त परतावा देण्याच्या दृष्टीने एसआयपी हे एक चांगले साधन मानलं जातं. एसआयपीसाठी 10 ते 12 टक्के परतावा सामान्य आहे. तुम्ही 12 टक्के परतावा असलेल्या SIP मध्ये 20 वर्षांसाठी दर महिन्याला 16,000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला 20 वर्षांनंतर सुमारे 1.60 कोटी रुपये मिळतील. तर 20 वर्षात तुम्ही सुमारे 38 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकाल. तर, 20 वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे 2.42 कोटी रुपयांचा निधी असेल. याचाच अर्थ तुम्ही भाड्याने राहून EMI भरण्याऐवजी पैशांची गुंतवणूक करून दुप्पट फायदा मिळवू शकता.