इचलकरंजी महापालिका नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवणार : save money & time
ताजी बातमी /ऑनलाईन टीम
इचलकरंजी महापालिका आता नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवणार आहे. ही किमया घडणार आहे पालिकेच्या ऑनलाईन यंत्रणेद्वारे.. आता मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रासह नळ जोडणी, भुयारी गटार जोडणी, घरफाळा भरणा, व्यवसाय परवाना अशा विविध ५३ सुविधा महापालिकेच्यावतीने ऑनलाईन online उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. लवकरच प्रभावीपणे ही यंत्रणा सक्रीय केली जाणार आहे. त्यामुळे शहरवासियांना घरबसल्या विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तसेच नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जाणार नाही. save money & time
महानगरपालिकेच्या वतीने शहरवासियांना विविध नागरी सुविधांसह विविध सेवा सुविधा पुरविल्या जातात. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महानगरपालिकेत अनेक फेऱ्या मान्याव्या लागतात. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसे वाया जातो. मात्र महानगरपालिका प्रशासनाने आता विविध सुविधा ऑनलाईन देण्यास सुरुवात झाली आहे.online service
यामध्ये तब्बल ५३ सुविधा नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. याबाबतची माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. यासाठी महापालिकेने एक सॉप्टवेअर कार्यान्वीत केले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर नागरिकांना आपल्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे.
कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले आहे. तर नागरिकांना नोंदणी करतांना आधार कार्ड नंबर हा सक्तीचा असणार आहे. त्यानंतर ओटीपीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन विविध सेवा प्राप्त करण्यासाठी पुढील मार्ग मोकळा होणार आहे.