Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगना परीक्षा, ना मुलाखत, पोस्टात थेट भरती; फक्त या उमेदवारांनी…

ना परीक्षा, ना मुलाखत, पोस्टात थेट भरती; फक्त या उमेदवारांनी…

 

 

पोस्ट ऑफिस अर्थात भारतीय डाक विभाग अंतर्गत मोठी बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. 9 डिसेंबर 2023 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. पोस्ट ऑफिसकडून घेण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी घेतली जात आहे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. यामुळे उच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.जाणून घ्या या भरती प्रक्रियेची सर्व माहिती आणि प्रक्रिया-

 

-पोस्ट ऑफिसकडून ही भरती प्रक्रिया 1899 पदांसाठी घेतली जात आहे

 

-ही भरती प्रक्रिया रिक्त जागांसाठी होत आहे

 

-ही पोस्टातील भरती प्रक्रिया मिनिस्ट्री ऑफ कम्यूनिकेशंसकडून राबवली जातंय.

 

-1899 पदांपैकी 598 पदे पोस्ट असिस्टंटसाठी, 143 पदे शॉर्टनिंग असिस्टंटसाठी, 585 पदे पोस्टमनसाठी, 570 पदे एमटीएस आणि 3 पदे मेल गार्डसाठी आहेत.

 

-ही सर्व पदे क्रीडा कोट्याअंतर्गत भरली जाणार आहेत.

 

-डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स (DOP), भारत सरकार या पदांवर भरती करेल.

 

-या भरती प्रक्रियेसाठी 100 रूपये फिस ही ठेवण्यात आलीये

 

-या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे

 

-भरती प्रक्रियेसाठी सर्व माहिती ही dopsportsrecruitment.cept.gov.in. या साईटवर मिळेल

 

-या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना हे लक्षात घ्या की, आपण अर्ज नेमका कोणत्या पदासाठी करत आहोत

 

-विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेशिवाय उमेदवाराची निवड या भरती प्रक्रियेसाठी केली जाईल.

 

-उमेदवाराची निवड ही गुणवत्तेवर होणार आहे.

 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमेदवारांनी वेळ अजिबात वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे पोस्ट विभागात थेट काम करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. अर्ज करताना या गोष्टीची काळजी घ्या की, आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -