इचलकरंजी : चंदुर मध्ये डॉल्बीवर बंदी, विवाह ठरलेल्या मुलींना साडी : क्रांतिकार निर्णय
लोकसहभागातून आदर्श गावाकडे वाटचाल करणाऱ्या चंदूर ग्रामपंचायतीने गावच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत.
मोटरसायकलचा सायलेंसर (पुंगळी) काढून रॅली काढण्यास बंदी, सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी बंदी, विवाह ठरलेल्या मुलींना साडी भेट आदी निर्णयांचा यात समावेश आहे.
माजी तालुका पं.स. सभापती महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने गत तीन वर्षात विविध ग्रप फंडांच्या माध्यमातून रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती आदी सुविधांसाठी आठ कोटी दोन लाखांची विकासकामे पूर्ण केली आहेत.