Monday, December 23, 2024
Homeअध्यात्ममार्गशीर्षातील पहिला व शेवटचा गुरुवार कधी? महालक्ष्मी व्रताच्या ‘या’ मुहूर्ताला गुरुपुष्यमृत योग;...

मार्गशीर्षातील पहिला व शेवटचा गुरुवार कधी? महालक्ष्मी व्रताच्या ‘या’ मुहूर्ताला गुरुपुष्यमृत योग; पूजा विधी, जाणून घ्या

हिंदू धर्मियांमध्ये व विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत केले जाते. महालक्ष्मीचे पूजन करून घट मांडण्याची पद्धत प्रचलित आहे. या महिन्यात सवाष्णींना वाण देण्याला तसेच कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना यंदा १३ डिसेंबर पासून सुरु होत आहे. १२ डिसेंबरला कार्तिक अमावस्या असून १३ डिसेंबरला पहाटे ५ वाजून १ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होत आहे. १३ तारखेपासून मार्गशीर्ष मासारंभ होत असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ डिसेंबरला मार्गशीर्षातील पहिला गुरुवार असणार आहे. यंदा कोणत्या तारखेला मार्गशीर्ष गुरुवार असतील तसेच, या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजा विधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मार्गशीर्ष गुरुवार २०२३ – २४ तारखा (Margshirsha Guruvar 2023-24)
यंदा मार्गशीर्षातील पहिला गुरुवार १४ डिसेंबर, दुसरा गुरुवार २१, तिसरा गुरुवार २८ डिसेंबर आणि चौथा गुरुवार ४ जानेवारी रोजी आहे. २८ डिसेंबरचा गुरुवार हा अत्यंत खास असणार आहे कारण याच दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून येत आहे.

आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो.

मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची? (Puja Vidhi)
मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -