मोदी यांनी राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंद
ठाणे : मीरा-भाईंदर मधून राम सेना फाउंडेशनच्यावतीने प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रामसेवक राम भक्त अयोध्येला जात आहेत. 47 दिवसांचा प्रवास हे मोठ्या कष्टाचं काम आहे. रामलीलाच्या प्रती दाखवलेले श्रद्धा आणि भक्ती त्यांना सुखरूप आयोध्याला पोहोचतील. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होतं अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केलं, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.