वाशिम : वाशिम जिल्हा आज कोरोना मुक्त झाला आहे. तब्बल 20 महिन्यानंतर जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे वाशिम जिल्ह्यात 41,769 इतके रुग्ण बाधित आढळले होते. तर 41,129 डिस्चार्ज करण्यात आले तर उपचारादरम्यान 629 जणाचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यात पहिला रुग्ण 3 एप्रिल 2020 ला सापडला होता. त्यानंतर रोग प्रतिबंधक कायद्यानुसार कडक अंमलबजावणी केल्याने पहिल्या लाटेत रुग्ण कमी आढळले होते. सलग दहाव्या दिवशी जिल्ह्यात नव्याने एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही तर दुसरीकडे एका जणाने कोरोनावर मात केली आणि वाशिम जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण सक्रिय नसल्याने, दीड वर्षानंतर बुधवारी पहिल्यांदाच जिल्हा कोरोनामुक्त ठरला आहे.
वाशिम जिल्हा प्रशासनाच्या कडक अंमलबजावणीमुळे पहिल्या लाटेत कोरोनाचा धोका कमी दिसला. मात्र दुसऱ्या लाटेचे गांभीर्य न दिसल्याने अनेकांना कोरोनाची बाधा झाली आणि अनेकांना जीव देखील गमवावे लागले. त्यात कोरोनावर प्रभावी असलेल्या रेमडेसिविर औषधाचा तुटवडा आणि ऑक्सिजनचा ही तुटवडा होत असताना आज मात्र जिल्हा कोरोनामुक्त झाला.
आनंदाची बातमी, महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त; एकही सक्रिय रुग्ण नाही
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -