इन्फोसिसचे फाऊंडर (Infosys Co Founder) नारायण मूर्ती आणि ऑरी यांच्यामध्ये डिबेट व्हायला हवी अशी चर्चा रंगली आहे.इन्फोसिसचे (Infosys) फाऊंडर नारायण मूर्ती (N. R. Narayana Murthy) यांनी आठवड्यात 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याचं समर्थन करत आहे, तर काही जण 70 तास काम (7 Days Working Week) करण्याच्या विरोधात आहेत. यावरून आधीच इंटनेटवर नेटकऱ्यांमध्ये जुंपली लागली असताना आता एका अब्जाधीशाने नारायण मूर्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुअंसर (Social Media Influencer) ऑरी (Orry) यांच्यात चर्चासत्र व्हायलं हवं असं म्हटलं आहे. त्यामुळे खरंच या दोघांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली तर काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहेइन्फोसिस (Infosys) या संस्थेचे संस्थापक (Co Founder) नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नारायण मूर्ती यांनी तरुणांना हा 70 तास काम करण्याचा सल्ला (Narayana Murthy Advice for Youngsters)दिला होता. यावरून आता उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी एका ऑरी आणि नारायण मूर्ती यांच्यामध्ये चर्चा व्हायला हवी असं म्हटलं आहे.उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म एक्स (X) म्हणजे आधीचं ट्विटर (Twitter) वर पोस्ट करत म्हटलं आहे. हर्ष गोएंका यांनी मजेदार शैलीत एक्स पोस्ट करत लिहिलं आहे की, नारायण मूर्ती (Narayana Murthy) आणि ऑरी (Orry) यांच्यात चर्चा व्हायला हवी. त्यांनी प्रश्न विचारला आहे की, ’70 तास काम या मुद्द्यावर कुणी ऑरी आणि नारायण मूर्ती यांच्यात चर्चासत्र आयोजित करु शकतं का?’जर आपण चीन (China) आणि जपान (Japan) यासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशांशी स्पर्धा करायची असेल, तर आपल्याला उत्पादकता अर्थात प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागेल. सध्या भारताची उत्पादकता कमी आहे. शिवाय आपली सरकारे निर्णय घेण्यासाठी जो वेळ घेतात तो सुद्धा खूप आहे. त्यातच सरकारी बाबूंच्या भ्रष्टाचारावर अंकूश लावणे आवश्यक आहे. हे सर्व पाहता भारतातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करावं लागेल, असं नारायण मूर्ती यांनी सांगितलं.