Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगएसटी महामंडळाचा मोठा निर्णय, मुलांपासून वृद्धांना एसटीचे तिकीट माफ; पण शहरी महिलांना...

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, मुलांपासून वृद्धांना एसटीचे तिकीट माफ; पण शहरी महिलांना…

 

 

बई : लालपरीच्या प्रवासात (MSRTC Fare) काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने (State Government) महिलांना प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत (Women 50 Percent Concession) जाहीर केली होती.त्यानंतर एसटीच्या या योजनेला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून एसटीच्या तिजोरीत भरभक्कम नफा जमा झाला आहे. प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा. यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीने मोफत प्रवास करता येणार आहेमोफत सवलतीच्या अटी आणि शर्ती याप्रमाणे असतील : महिलांना सर्व सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सूट मिळणार आहे. साधी, छोटी बस, निमआराम म्हणजेच एशियाड, नॉन-अ‍ॅडजस्टेबल स्लीपर, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ही सवलत लागू असणार आहे.महिलांसाठी सवलतीच्या तिकिटांचा रंगही वेगळा असणार आहे. प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर जीएसटी लागू असेल. उदा. तुमचे तिकीट जर 10 रुपये आहे तर तुम्हाला 5 रुपये आणि 2 रुपये टॅक्स वजावट मिळेल. म्हणजेच तुम्हाला 7 रुपये तिकीट द्यावे लागणार आहे.राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये कुठेही प्रवास करता येतो. पण, जर तुम्हाला राज्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी वेगळे भाडे द्यावे लागेल. उदा. जर तुम्ही मुंबई ते हैद्राबाद असा प्रवास करत असाल, तर ही सूट फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत वैध असेल, त्यानंतर पूर्ण तिकीट जारी केले जाईल.शहरी वाहतुकीवर महिलांना ही सवलत मिळणार नाही. त्यांना आरक्षणाच्या तिकीटावर प्रवास करायचा असेल तर त्यांना ही सूट लागू होणार नाही. 5 ते 12 वयोगटातील मुलींना 50% सवलत मिळेल, कारण अमृत जेष्ठ नागरीक योजना 75 वर्षांवरील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -