सांगलीतील चार कुख्यात गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सांगलीतील पाटील टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये पाटील टोळीचा म्होरक्या करण रामा पाटीलसह आणखी चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सांगली शहरातल्या संजयनगर, विश्रामबाग आणि कुपवाड परिसरातील सराईत गुन्हेगार करण रामा पाटील यांच्या पाटील टोळीने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दहशत निर्माण करत खुनी हल्ला, चोरी, लूटमार, दरोडा यांसारखे 23 गंभीर गुन्हे केले आहेत.पाटील टोळीचा म्होरक्या करण रामा पाटील (वय 22) राहणार कुपवाड याच्यासह विकास गोसावी, आकाश जाधव, अमोल साठे या सर्व जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
चोरी, खून, दरोडे; सांगलीतील पाटील टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -