Wednesday, September 27, 2023
Homeकोल्हापूरवाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू

वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू

कागल मुरगुड रस्त्यावर व्हणाळी (ता. कागल, जि. कोल्हापूर) जवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला. (Kolhapur Accident ) त्यानंतर गाडी जळत जळत सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. त्यामध्ये गाडी चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

आज शुक्रवारी सकाळी अभिजित हणमंत धनवडे (वय ३१, रा. कणेरी) हे आपली गाडी क्रमांक MH 09 AQ 3703 मधून प्रवास करत असताना अचानक गाडीचा स्फोट झाला. त्यानंतर पेट घेतलेली गाडी जळत जळत सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. यामध्ये धनवडे यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. गाडी दरीत पडल्यानंतर परिसरातील गवतालाही आग लागली.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र