Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनबच्चन कुटुंबापासून विभक्त होतेय ऐश्वर्या राय? ‘या’ व्हिडीओनंतर तुम्हालाही कळेल सत्य नक्की...

बच्चन कुटुंबापासून विभक्त होतेय ऐश्वर्या राय? ‘या’ व्हिडीओनंतर तुम्हालाही कळेल सत्य नक्की काय? व्हिडीओ पहा

बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून दूर होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एवढंच नाही तर, ऐश्वर्या आता सासरी राहात नसून माहेरी आईसोबत राहात असल्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या.. पण ऐश्वर्या हिने ‘जलसा’ बंगला सोडल्याची गोष्ट सत्य आहे ती असत्य याबद्दल सध्या काहीही कळू शकलेलं नाही. अशात सध्या समोर येत असलेल्या व्हिडीओमुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्यामध्ये सर्वकही सुरळीत सुरु असल्याचं चित्र दिसत आहे.

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यामध्या वाद सुरु असून, दोघे फक्त लेक आराध्या हिच्यामुळे एकत्र राहात आहेत असं देखील समोर आलं. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसत असून, दोघे देखील आनंदी आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील आहे. याच शाळेत बच्चन कुटुंबाची लेक आराध्या बच्चन शिकते. आराध्या हिच्या एनुअल फंक्शनसाठी ऐश्वर्या आणि अभिषेत उपस्थित होते. व्हिडीओमध्ये दोघे देखील आनंदी दिसत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या – अभिषेक यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नाचे फोटो आज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)


महत्त्वाची गोष्ट म्हणजे, . लग्नानंतर अनेक वर्ष चाहत्यांना कपल गोल्स देणाऱ्या ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगत असल्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर ऐश्वर्या – अभिषेक यांनी मौन बाळगलं आहे.

ऐश्वर्या – अभिषेक यांना कायम लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. आराध्या लोकप्रिय सेलिब्रिटी किड्स पैकी एक आहे. आराध्या हिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, आई ऐश्वर्या हिच्यासोबत आराध्या कायम असते. सध्या आराध्या तिचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -