Monday, March 4, 2024
Homeक्रीडाविराट, रोहितला विश्रांती.. कोण असणार कॅप्टन वाचा.?

विराट, रोहितला विश्रांती.. कोण असणार कॅप्टन वाचा.?

टी-20 वर्ल्ड कप झाल्यावर न्यूझीलंड संघ युएईमधून थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 टी-20 सामने व 2 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, बीसीसीआयने आज (ता. 12 नोव्हेंबर) भारताच्या कसोटी संघाची घोषणा केलीय. विशेष म्हणजे, या टेस्टसाठी विराट कोहलीसह रोहित शर्मालाही विश्रांती देण्यात आली आहे. टेस्ट संघाच्या नेतृत्वाची हंगामी जबाबदारी मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याच्यावर सोपविण्यात आली आहे.

रोहित शर्मा टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, त्यानंतर तो पूर्ण कसोटी मालिका खेळणार नाही, तर विराट कोहली फक्त दुसरा कसोटी सामना खेळणार असल्याचे सांगण्यात आले.

भारत व न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूर येथे 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान खेळविला जाणार आहे, तर दुसरा कसोटी सामना मुंबईमध्ये 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

पुजारा असेल उपकर्णधार
पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करील, अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीकडे पुन्हा नेतृत्वाची धुरा दिली जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. पंतच्या जागी वृद्धिमान साहा यष्टीरक्षण करणार आहे, तर के. एस. भरत या मालिकेत दुसरा यष्टीरक्षक असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -