Sunday, December 22, 2024
Homeअध्यात्मदत्तजयंती दिवशी स्वामींना दाखवा 'हा नैवेद्य; स्वामी प्रसन्न होतील : यशस्वी बनाल...

दत्तजयंती दिवशी स्वामींना दाखवा ‘हा नैवेद्य; स्वामी प्रसन्न होतील : यशस्वी बनाल !

 

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

 

मित्रांनो, आपल्यापैकी काहीजण हे स्वामींचे अत्यंत मनोभावे व श्रद्धेने सेवा करीत असतात. स्वामींचे भक्त पारायणे तसेच स्वामींचा मंत्र जाप करण्यासाठी कायम तत्पर असतात. स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी आणि आपले कुटुंबीय कायम आनंदी रहावे अशी भक्तांची इच्छा असते आणि स्वामी देखील त्यांना कशाचीच कमतरता भासू देत नाहीत. 18 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे.

 

दत्तजयंती स्वामींसाठी खूप महत्वाचा दिवस असतो. या दिवशी पारायणे केली जातात. दत्तजयंतीच्या आधी सात दिवस किंवा दत्तजयंती नंतर सात दिवस पारायणे केली जातात. या पारायनामध्ये अनेक भाविक मनोभावे व श्रद्धेने स्वामींची सेवा करीत असतात. या दिवशी तुम्ही स्वामींची छोटीशी देखील सेवा किंवा पूजा केली तर स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होऊन त्यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला नक्की देतील.

 

स्वामी आपल्या सोबत कायम रहावेत व आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात, त्यांनी तुम्हाला दर्शन द्यावे असे वाटत असेल तर दत्तजयंती दिवशी तुम्हाला स्वामीसाठी एक नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य दाखवल्याने तुमच्या काही इच्छा असतील तर सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील. चला तर मग पाहूया दत्तजयंती दिवशी स्वामींना कोणता नैवेद्य दाखवावा?

 

मित्रांनो, स्वामींना पुरणपोळी, खीर, कांदा भजी अतिशय प्रिय आहेत. तसेच स्वामींना वरण-भात देखील आवडते. तुम्ही दत्तजयंती दिवशी स्वामींना आवडणाऱ्या या पदार्थांचा नैवेद्य जर दाखवला तर स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील. तसेच स्वामींना आमटी-भात व रशी भात देखील अतिशय प्रिय होते. जेव्हा स्वामी हयातीत होते त्यावेळेस त्यांच्या भक्तांनी स्वामीं साठी आणलेले हे पदार्थ स्वामी अतिशय आवडीने खात असत.

 

स्वामींच्या विशेष दिवशी म्हणजेच स्वामी जयंती व दत्तजयंती या दिवशी तुम्ही स्वामींना आवडणारा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजेच पुरणपोळी, खीर तुम्ही घरी बनवून स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. त्यामुळे स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला भेटून तुमच्या सर्व अडचणी स्वामी दूर करतील व स्वामी कायम तुमच्या सोबतच राहतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -