स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे ही मोठी मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे,स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही भरती प्रक्रिया सर्किल बेस्ड ऑफिसर म्हणजेच सीबीओ या पदासाठी होत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तारीख वाढून देण्यात आलीये. यामुळे आजच शेवटचा दिवस असल्याने अजिबात वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करा.भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अगोदर 12 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख देण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आता 17 डिसेंबर 2023 आहे. इच्छुकांनी फटाफट अर्ज करावेत. ही शेवटची संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये थेट नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. sbi.co.in वर जाऊन तुम्हाला अर्ज हे करावे लागणार आहेत. याच साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती आरामात मिळेल. या भरती प्रक्रिेयेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवार हा कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.पदवीधर असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. शिक्षणासोबतच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 30 असावे. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आलीये. उमेदवाराची निवड ही परीक्षेमधून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही जानेवारी 2024 मध्ये घेतली जाणार आहे. यानंतर उमेदवाराच्या निवडीबद्दल अपडेट दिले जाईल. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. 750 रूपये फिस ही या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला भरावी लागणार आहे.