टीम इंडियाचा धुरंदर आणि आयपीएलमधील सर्वात यशस्वी कॅप्टनपैकी एक असलेल्या हिटमॅन रोहित शर्माला कर्णधारपदावरून (Rohit Sharma Removal As Mumbai Indians Captain) हटवण्याचा निर्णय आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांना पसंत पडलेला नाही. शुक्रवारी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले आणि आगामी हंगामासाठी संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली. या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड नाराज झाले असून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. रोहितने 11 हंगामात मुंबईचे नेतृत्व केले आणि पाच वेळा विजेतेपद पटकावले. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच त्याची पत्नी रितिका सजदेहने (Ritika Sajdeh First Reaction) या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रितिकाने CSK च्या पोस्टवर टिप्पणी केली.
चेन्नई सुपर किंग्जने रोहित शर्मासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, 2013- 2023 हे दशक धाडसी आव्हानाचे! खूप आदर, रोहित! रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने या पोस्टवर पिवळ्या हार्ट इमोजीसह प्रतिक्रिया दिली आहे.सोशल मीडियाची आकडेवारी दाखवणाऱ्या एका कंपनीनुसार, फॉलोअर्स फक्त इंस्टाग्रामवरच नाही तर यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मुंबई इंडियन्स सोडत आहेत. मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवर 4.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स कमी झाले आहेत. यूट्यूब वरून 10000 लोकांनी मुंबई इंडियन्स संघाच्या चॅनेलची अनसब्सक्राइब केलं आहे. सुमारे 33 हजार चाहत्यांनी ट्विटरवर मुंबई इंडियन्सला अनफॉलो केले आहे.