देशात सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असणारी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणात ग्राहक खातेदार आहेत. मात्र आता SBI ने ग्राहकांना एक झटका दिला आहे.कारण SBIने कर्ज घेण्याच्या व्याजदरात वाढ केली आहे ज्यामुळे लोकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने MCLR आणि बेस रेट वाढवले आहेत. नवीन दर बँकेने 15 डिसेंबर 2023 पासून लागू केले आहेत. यासंबंधीची माहिती एसबीआयच्या वेबसाइटवरही अपडेट करण्यात आली आहे. MCLR हा किमान व्याज दर आहे ज्यावर बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकते. SBI ने बेस रेट 10.10% वरून 10.25% केला आहे.
तीन वर्षांचा MCLR 10 बेसिस पॉइंटने वाढला आहे.
डिसेंबर 2023 साठी SBI चे MCLR दर 8% आणि 8.85% च्या दरम्यान आहेत. रात्रीचा MCLR दर 8% निश्चित करण्यात आला आहे. एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR दर 8.15% वरून 8.20% करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा MCLR 10 bps ने वाढून 8.55% झाला आहे. ग्राहक कर्जाशी संबंधित एक वर्षाचा MCLR 10 bps ने 8.55% वरून 8.65% पर्यंत वाढवला आहे. दोन वर्षांचे आणि तीन वर्षांचे MCLR देखील 10 बेस पॉईंटने वाढले आहे आणि 8.75% आणिआणि 8.85% पर्यंत वाढले आहे.
याशिवाय बीपीएलआरमध्येही 15 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली असून ती 15 टक्के करण्यात आली आहे. हा बदल देखील 15 डिसेंबर 2023 पासून लागू झाला आहे. SBI ने नुकतीच होम लोनच्या व्याजदरात 65 बेस पॉइंट्स पर्यंत कपात करून विशेष सणासुदीची ऑफर सादर केली आहे. ही ऑफर 31 डिसेंबर 2023 पर्यंत असणार आहे. तसेच बँकेकडून 8.4% दराने गृहकर्ज दिले जात आहे. याशिवाय, ग्राहकांना SBI टॉप-अप हाऊस लोनवर 8.9% सवलतीचा दर देखील मिळू शकतो. म्हणजेच 1 जानेवारीपासून तुम्हाला गृहकर्जासाठी अधिक व्याज द्यावे लागणार आहे.
कर्जावरील सवलतीचा लाभ कसा मिळवायचा?
दरम्यान, SBI च्या फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत, तुम्ही सूट देऊन कर्ज घेऊ शकता. ऑफरनुसार, तुम्ही 0.17% प्रोसेसिंग फीसह 8.40% वार्षिक दराने कर्ज घेऊ शकता. तथापि, ऑफरमुळे, तुम्ही 65 बेस पॉइंट्सच्या सूटसह गृहकर्ज घेऊ शकता.