Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगपशुपालकांसाठी सुवर्ण संधी; 75 टक्के अनुदानावर विविध योजनांचे अर्ज सुरु!

पशुपालकांसाठी सुवर्ण संधी; 75 टक्के अनुदानावर विविध योजनांचे अर्ज सुरु!

 

राज्य सरकारच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Agri Schemes) राबविल्या जातात. यामध्ये दुधाळ जनावरे शेतकऱ्यांना वाटली जातात. तर शेळी-मेंढी गट वाटप केला जातो.सरकारच्या योजनांच्या लाभ घेऊन असे अनेक शेतीपूरक व्यवसाय सुरु करू शकतात. यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली असून, 18 डिसेंबर ही अखेरची मुदत (Agri Schemes) असणार आहे. त्यामुळे आज जवळच्या डिजिटल केंद्रात जाऊन अर्ज करा.

 

राज्य सरकारकडून पशुपालकांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांचे (Agri Schemes) राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे स्वरूप आहे. या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 15 डिसेंबरपर्यंत करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र या योजनांचे समाधानकारक अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 18 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी पशुपालकांनी योजनांसाठी अधिकाधिक अर्ज भरुन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

राज्य स्तरीय योजनामध्ये 10+1 शेळीगट, दोन दुधाळ जनावरांचा गट वाटप व 1000 मांसल कुक्कुट पक्षीगृह बांधकाम या योजनासाठी अर्ज शेतकऱ्यांना करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन पशु संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. तर मोबाईलव्दारे अर्ज करण्यासठी AIH.MAHABMS या अँपवर जाऊनही अर्ज करता येणार आहे. पशु संवर्धन विभागातील सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

अशा आहेत योजना(Agri Schemes For Farmers)

 

1. 10+1 शेळीगट ही योजना

 

ही योजना अनुसूचित जाती जमातीसाठी आहे.

अनुदानाची टक्केवारी 75 टक्के असून म्हणजेच 77 हजार 569 इतकी रक्कम असून २५ टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावयाची आहेत.

या योजनेसाठी लाभधारक बीपीएल, बचत गट, अल्प भूधारक असायला हवा. लाभधारक तीन अपत्ये असणारा नको.

यानंतर लाभार्थ्यांची यादी तयार करून योजना राबवली जाईल.

ज्यांची नाव यादीत असूनही लाभ मिळाला नाही, अशा लाभधारकांना प्रतीक्षा यादीत ठेऊन पुढील वर्षी लाभासाठी प्राधान्य दिले जाईल.

2. दोन दुधाळ जनावरांचा गट योजना

 

ही योजना अनुसूचित जाती जमातीसाठी आहे.

या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान शासनाकडून तर 25 टक्के अनुदान लाभार्थ्यांना द्यावे लागते.

यात गायगटासाठी 1 लाख 17 हजार 638 रुपये एकूण रक्कम आहे.

म्हैस गटासाठी 1 लाख 34 हजार 443 रुपये इतकी रक्कम आहे.

3. 10+1 शेळी गट योजना

 

ही योजना अनुसूचित जमातीसाठी आहे.

या योजनेतही 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

77 हजार 569 रुपये अशी एकूण अनुदानाची रक्कम असणार आहे.

4. कुक्कुट गट वाटप योजना

 

ही योजना 100 एकदिवसीय कुक्कुट गट वाटप ही योजना असून ही सर्व प्रवर्गासाठी आहे.

यासाठी 50 टक्के अनुदान असून, 50 टक्के अनुदान लाभार्थ्याला देणे आहे.

5. 25+3 तलंगा गट वाटप योजना

 

यासाठी देखील 50 टक्के अनुदान आहे.

या सर्व योजनासाठी जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, फोटो, जनावरांना जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

स्वतःची जागा असेल तर नमुना नंबर 8 आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -