बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) यांच्याबद्दल एकामागून एक बातम्या समोर येत आहेत. त्यांच्यातील कौटुंबिद वाद घटस्फोटापर्यंत गेल्याची कुजबुज सुरु झाली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या मालकीचा प्रतीक्षा बंगला लेकीच्या नावे केल्यानंतर या वादात आणखी तेल ओतल्याचे मीडियामधील अनेक रिपोर्ट्समध्ये बोललं जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नुकतेच हे दोघेही म्हणजेच अभिषेक आणि ऐश्वर्या ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी एकत्र आले होते. यानंतर, अभिनेत्री तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या धीरूभाई इंटरनॅशनल स्कूल, मुंबईच्या वार्षिक कार्यक्रमात दिसली. मात्र, यानंतरही ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन एकत्र दिसत होते. हे पाहिल्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या.
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन एकत्र दिसले
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन विभक्त झाल्याची बातमी चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन कारमधून उतरताना दिसत होते. यावेळी ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या. ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या व्हिडिओवर चाहत्याच्या कमेंट्स
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या या व्हायरल व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. अनेक यूजर्स ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताना दिसले. त्यामुळे सुरू असलेल्या अफवांवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण बहुतेक लोक ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे कौतुक करताना दिसले.