दरम्यान रोहित शर्माला कर्णधारपदावरून वगळण्याचा निर्णय त्याच्या सहमतीने दर्शवला होता का, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मुंबई इंडियन्सला असा विश्वास आहे की, रोहित शर्मा टीमसाठी अविभाज्य भूमिका बजावत राहणार आहे. IPL 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर बदल करण्याबाबत विचार होईल. महेला जयवर्धने यांनी मंगळवारी सांगितले की, फ्रँचायझीमधील खेळाडूंच्या पुढील पिढीला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने रोहित पाच वेळा चॅम्पियनसाठी ‘खूप महत्त्वाचा’ असणार आहे, असंही म्हटलंय.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचं नाव घेतलं जातं. मुंबई इंडियन्सने आपल्या सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला घेण्याचा निर्णय घेतला. हे कितपत योग्य की अयोग्य हे येणारा काळच सांगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 4 वेळा ट्रॉफीवर नाव कोरण्यात यश मिळालं आहे. जयवर्धने यांनी पुढे सांगितलं की, मुंबई इंडियन्स ‘रीसेट’ बटन दाबण्यासाठी फार उत्सुक आहे. मुख्य म्हणजे ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आम्ही फ्रेंचायझी म्हणून बोललो आहोत. हा एक कठीण निर्णय आहे, पण आम्हाला तो घ्यावा लागला. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे फार इमोशनल आणि कठीण आहे.