Thursday, February 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; पैसे सुट्टे देण्याच्या बहाण्याने २५ हजाराची रोकड लंपास

कोल्हापूर ; पैसे सुट्टे देण्याच्या बहाण्याने २५ हजाराची रोकड लंपास

गंगावेश ते गुजरी जाणाऱ्या रोडवर असलेल्या व्हीजन अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटीत ५०० रुपये सुट्टे घेण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने हातचालाखीने सोसायटीच्या कॅशिअरकडून २५ हजार रुपये लंपास केले. गुजरीतील एका सराफ व्यावसायिकाचेही ८ हजार ५०० रुपये लंपास केले. याबाबत अपर्णा अमर गवळी (वय ३३, रा. वाय.पी. पोवार नगर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी शोधण्याचे कारण पुढे करत जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखला करण्यास ३६ तास घालवले.

गंगावेश परिसरात व्हीनस अर्बन सोसायटीच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी एक अज्ञात व्यक्ती आली. त्या कॅशिअर महिलेकडे ५०० रुपयांची नोट देऊन सुट्ट्या पैशांची मागणी केली. त्यावेळी पुन्हा एक नोट बदलून घेण्याच्या बहाण्याने त्याने महिलेच्या हातातील नोटांच्या बंडलातील २५ हजार रुपयांच्या नोटा काढून घेतल्या. तो निघून गेल्यानंतर काही वेळाने कॅशिअर महिलेस हा प्रकार लक्षात आला दरम्यान, मंगळवारी दुपारीच गुजरीतही एका सराफाच्या दुकानातून भामट्याने ५०० रुपये सुट्टे घेण्याच्या बहाण्याने सहा हजार रुपये लांबवल्याचा प्रकार घडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -