Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशभारतात मुस्लिमांचं भविष्य काय? पारशी समाजाचा उल्लेख करत मोदी म्हणाले

भारतात मुस्लिमांचं भविष्य काय? पारशी समाजाचा उल्लेख करत मोदी म्हणाले

2024 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज असून त्यांच्या देहबोलीमधून तो आत्मविश्वास दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नरेंद्र मोदींनीही मागील 10 वर्षांच्या तुलनेत आगामी वर्षांमध्ये भारताच्या लोकांच्या अपेक्षा फारच वेगळ्या असतील, असं म्हटलं आहे. फायनॅनशिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी, “आपला देश मोठी झेप घेण्यासाठी तयार आहे याचा अंदाज आता लोकांना आहे.

या उड्डाणाला वेग मिळवून द्यावा असी त्यांची इच्छा आहे. तसेच हा वेग मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम पक्ष आमचाच आहे असून आम्हीच त्यांना इथवर घेऊन आलोय हे सुद्धा त्यांना ठाऊक आहे,” असं म्हटलं. पंतप्रधान मोदींना भारतातील मुस्लिमांसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला. मोदींनी याचं उत्तर देण्याऐवजी पारशी समाजाच्या आर्थिक विकासासंदर्भात भाष्य केलं. पारशी समाजाचा उल्लेख करत विधान भाजपाच्या कार्यकाळामध्ये मुस्लिमांसंदर्भात अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुस्लिमांविरोधातील वक्तव्यांचा मुद्दा वेळोवेळी गाजला.

भाजपावर टीका करणारे सध्या भाजपामध्ये एकही मुस्लीम खासदार किंवा मोठ्या पदावर असलेला मंत्री नाही असं म्हणतात. या मुलाखतीत यावरुनच पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी पारशी लोकांच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत त्यावर प्रतिक्रिया दिली. पारशी समाजाला भारतात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समुहांपैकी एक समजलं जातं. पारश्यांची संख्या फार कमी आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सूचक शब्दांमध्ये आपलं म्हणणं मांडलं.

मुस्लिमांबद्दल काय म्हणाले? देशातील 20 कोटी मुस्लिमांचा थेट कोणताही संदर्भ न देता पंतप्रधान मोदींनी, “जगभरामध्ये अनेक ठिकाणी छळ सहन केल्यानंतर त्यांना भारतात सुरक्षित आश्रय मिळाला. ते समाधानी आणि समृद्ध जीवन जगत आहेत. यावरुनच असं दिसून येत आहे की भारतीय समाजामध्ये कोणत्याही धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्ध भेदभावाची भावना मनात नाही,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -