Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; मतदार यादीच्या सुनावणीकडे हरकतधारकांचा प्रतिसादच नाही: पुन्हा आज व उद्या...

इचलकरंजी ; मतदार यादीच्या सुनावणीकडे हरकतधारकांचा प्रतिसादच नाही: पुन्हा आज व उद्या होणार सुनावणी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत गैरहजर, स्थलांतरीत व मयत मतदारांची नावे वगळण्या बाबतचा कार्यक्रम राबविणेत आलेला असून त्या अनुषगांने गैरहजर, स्थलांतरीत मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत प्रत्यक्ष व पोस्टामार्फत एकूण ७४१५ नोटीसा देणेत आलेल्या आहेत. त्याअनुषगांने १४ डिसेंबर २०२३ व दि. १५ डिसेंबर २०२३ या दोन दिवशी अपर तहसिलदार कार्यालय, लाल बहादूर शास्त्री हॉल, जुनी नगरपालिका इमारत, इचलकरंजी येथे सुनावण्या लावणेत आलेल्या होत्या. या सुनावणी दरम्यान ५९९ मतदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आप-आपले खुलासे व पुरावे सादर केलेले आहेत. एकूण ७४१५ इतक्या मतदारांना नोटीस देवून सुध्दा फक्त ८ टक्के इतक्या मतदारांनी सुनावणीवेळी उपस्थित राहून पुरावे सादर केलेले आहेत.

उर्वरित ६८१६ इतके मतदार उपस्थित राहिलेले नाहीत. परंतू यातील काही मतदार अपरिहार्य कारणामुळे सुनावणीसाठी उपस्थित राहू शकलेले नाहीत अशा मतदारांसाठी त्यांचे म्हणणे व पुरावे घेण्यासाठी आणखी एकसंधी या कार्यालयाकडून उपलब्ध करुन देणेत येत आहे. तरी सदर मतदारांनी सुनावणीसाठी पुराव्याच्या कागदपत्रासहसमक्ष अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या कुटूंबातील व्यक्ती प्राधिकार पत्रासह गुरुवार ता. २१ डिसेंबर व शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजलेपासून ते कार्यालयीन वेळेपर्यंत अपर तहसिलदार कार्यालय इचलकरंजी, लाल बहाददूर शास्त्री हॉल, जुनी नगरपालिका इमारत, इचलकरंजी येथे उपस्थित रहावे. सदर दिवशी जे मतदार उपस्थित राहणार नाहीत त्यांची नावे नियमानुसार वगळणेची कार्यवाही करणेत येईल, अशी माहिती मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -