Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगचर्चा तर होणारच! कतरिना कैफने केलं विजय सेतुपतीला किस? काय आहे नेमकं...

चर्चा तर होणारच! कतरिना कैफने केलं विजय सेतुपतीला किस? काय आहे नेमकं प्रकरण

कतरिना कैफ आणि विजय सेतुपतिचा ‘मेरी ख्रिसमस’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सिनेमाचा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरंतर युजर्सचं असं म्हणणं आहे की, या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अंधाधुन’ आणि ‘बदलापूर’ सिनेमांप्रमाणेच अनुभव येतो. ‘मेरी क्रिसमस’चा ट्रेलमधील ओपनिंग सीनच डोक्यात अनेक प्रश्न निर्माण करतो आणि या सिनेमात थ्रिल आणि सस्पेन्स किती टोकाला जातो हेही दाखवण्यात आलं आहे.

कसा आहे सिनेमाचा ट्रेलर

एका व्यक्तीसोबत एका छोट्या मुलची सावली दिसते. कदाचित तो माणूस त्या मुलीला सांगतोय की, जेव्हापासून ही दुनिया बनली आहे ना! तेव्हापासून आम्ही सगळे एका क्षणाच्या शोधात आहोत आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा समजून येतं की शेकडो वर्षापासून चालत आलेलं आयुष्य हे एका क्षणासाठी होती. यानंतर सीन कट होतो आणि कतरिना आणि विजय सेतुपतीचा सीन सुरु होतो. दोघं भेटतात आणि तीन तास एकमेकांसोबत खूप सुंदर वेळ घालवतात. पण या तीन तासात विजय सेतुपती आणि कतरिनाचं आयुष्य कसं बदलतं आणि काय काय भयंकर होतं हे पाहून तुमच्या भुवया उंचावतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -