Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंग'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका

‘राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा’ ठाकरे गटाची टीका

22 जानेवारी 2024 ला अयोध्येत भगवन श्रीराम मंदिरात रामल्ललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर श्रीरामाच्या चरण पादुकाही तिथे ठेवल्या जाणार आहे. या पादुकांचं सध्या देशभरात दर्शन घडवलं जात आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी म्हणजे 19 जानेवारीला पादुका अयोध्येत आणल्या जातील. 22 जानेवारीच्या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक नामवंत पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्याचं सर्वात पहिलं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलं. या सोहळ्याला 7 हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं असून यात 3 हजार VVIP पाहुण्याचा समावेश आहे.

उद्धव ठाकरेंना आमंत्रण?द

रम्यान, राम मंदिराच्या आंदोलनात योगदान असणाऱ्यांना सरकार निमंत्रण देणार नाही. ज्यांचं काहीही योगदान नाही अशांचा अयोध्येत सोहळा रंगणार असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीय. एकीकडे राम मंदीर ट्रस्टनं सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्ष नेत्यांना अयोध्या सोहळ्याचं निमंत्रण दिलं असताना राम मंदिराच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार नाहीत असा दावा संजय राऊतांनी केलाय राम मंदिराच्या लढ्यात जे सहभागी झाले होते त्यांना अयोध्येतील सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आल्याची टीका राऊतांनी केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -