Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानयावर्षात Share Market ने केले मालामाल; 280 शेअर ठरले मल्टिबॅगर

यावर्षात Share Market ने केले मालामाल; 280 शेअर ठरले मल्टिबॅगर

यावर्षात Share Market ने केले मालामाल; 280 शेअर ठरले मल्टिबॅगर

वर्ष 2023 मध्ये शेअर बाजारने कमाल दाखवली. शेअर बाजाराने उच्चांकी विक्रम नावावर नोंदवले. शेअर बाजाराची घौडदौड सुरु आहे. हे वर्ष संपण्यात आहे. आता केवळ एक आठवड्याचे व्यापारी सत्र उरले आहे. हे कॅलेंडर वर्ष शेअर बाजारासाठी महत्वपूर्ण ठरले आहे. शेअर बाजारात चढउतार होतात. पण गुंतवणूकदारांना या वर्षात मालामाल होता आले. अनेक शेअर्स मल्टिबॅगर ठरले. या कालावधीत 82 टक्के शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. निफ्टी, मुंबई स्टॉक एक्सचेंजमधील शेअर्सनी कमाल केली. काहींनी तर छप्परफाड कमाई करुन दिली.

निफ्टीतील प्रमुख निर्देशांकात तेजी

बिझनेस टुडेतील एका अहवालानुसार, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर यावर्षी 19 डिसेंबरपर्यंत 82 टक्के शेअर्संनी गुंतवणूकदारांना अनुकूल परतावा दिला. त्यामुळे एनएसईमध्ये तेजीचे सत्र दिसले. 19 डिसेंबरपर्यंत एनएसई निफ्टी 50.18 टक्के मजबूत दिसला. तर निफ्टी स्मॉलकॅप 250 मध्ये 46 टक्के आणि निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्समध्ये 42 टक्क्यांची तेजी दिसून आली.

सर्वाधिक तेजी या शेअरमध्ये

शेअर बाजारात काही खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावली. यावर्षात 19 डिसेंबरपर्यंत विचार करता, सर्वाधिक सूसाट कामगिरी जय बालाजी इंडस्ट्रीजची ठरली. हा शेअर 1,291 टक्क्यांनी उसळला. या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर 54.70 रुपयांवर होता. तर आता हा शेअर 761.05 रुपयांवर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एसअँडएस पॉवर स्विचगिअर हा शेअर आहे. त्याने या वर्षात 616 टक्क्यांची भरारी घेतली. तर तिसऱ्या क्रमांकावर जीके वायर्सचा क्रमांक आहे. हा शेअर 544 टक्क्यांनी वधारला.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -