Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीकबनूरमधील साखळी उपोषणास २२ व्या दिवशी वाढता पाठिंबा

कबनूरमधील साखळी उपोषणास २२ व्या दिवशी वाढता पाठिंबा

कबनूरः ‘अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असून या समाजाला तत्काळ आरक्षण देणे आवश्यक आहे,’असे प्रतिपादन बाळ महाराज यांनी केले. येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात दर्ग्याच्या कट्ट्यावर सकल मराठा समाजाच्यावतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या २२ व्या दिवशी त्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. त्यावेळी ते बोलत होते.

साखळी उपोषणाच्या २२ व्या दिवशी अशोक कदम, अमोल कारंडे, दत्तात्रय पाटील, प्रशांत जगताप, अनिल जमदाडे, बाळासाहेब कणसे, रवींद्र धनगर, दत्तात्रय शिंदे, कृष्णात मगर, उत्तम जाधव, सागर कोले हे उपोषणाला बसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन माजी उपसरपंच चंद्रकांत आडेकर, शिवाजी चव्हाण यांनी केले. मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, महाराष्ट्र क्रांती सेना अध्यक्ष सुरेश पाटील,ज्येष्ठ नेते सुधाकरराव मणेरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -