Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरराजस्थानी प्रिमियर लिग आजपासून

राजस्थानी प्रिमियर लिग आजपासून

जयसिंगपूर : येथील मारवाडी युवा मंचतर्फे आजपासून राजस्थानी प्रिमियर लिग-२०२४ क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. शनिवारी (ता.२३) दुपारी चार वाजता अयोध्या मालू क्रिडानगरी येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते उद्‍घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी टिना गवळी आहेत.

माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहीणी सोळुंकी, पोलिस निरीक्षक संदिप कोळेकर, आनंद बेदमुथा, दिपक बियाणी आदी उपस्थित राहणार आहेत. दहा संघ सहभागी असल्याची माहिती अध्यक्ष चेतन चौधरी यांनी दिली. प्रसन्न लुणिया, प्रविण पोरवाल, प्रवीण भट्टड आदी उपस्थित होते. स्पर्धा शनिवार ते सोमवारपर्यंत चालणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -