Tuesday, May 21, 2024
Homeकोल्हापूरकुरुंदवाडमध्ये शिवसेनेकडून कंगनाच्या पुतळ्याचे दहन

कुरुंदवाडमध्ये शिवसेनेकडून कंगनाच्या पुतळ्याचे दहन

रक्त, घाम, अश्रू आणि त्यागातून मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याला ‘भीक’ असे संबोधणे हा राष्ट्रद्रोह आहे. अशा व्यक्तीस पुरस्कार देशाचे राष्ट्रपती ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवितात. स्वातंत्र्य व क्रांतिकारकांच्या बलिदानाची थोडी जरी जाण असेल तर अशा राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगना रणावतचा राष्ट्रीय पुरस्कार काढून घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केला.

कुरुंदवाडमधील भालचंद्र थिएटर चौक येथे शनिवारी दुपारी दोन वाजता हातकणंगले लोकसभा मतदार संघ शिवसेनेतर्फे अभिनेत्री कंगना रणावतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ कंगनाच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले.

शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे म्हणाले, कंगना राणावत या भाजपवादी अभिनेत्रीचा वरचा मजला रिकामा असल्याने स्वातंत्र्य बद्दल त्याने असे देशद्रोही वक्तव्य केले आहे. लायकी नसणाऱ्या राणावत याने देशाची माफी मागावी अशी मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -