Saturday, September 30, 2023
Homeकोल्हापूरदूधगंगा नदीकाठावरील गावांत गॅस्ट्रोसदृश आजार

दूधगंगा नदीकाठावरील गावांत गॅस्ट्रोसदृश आजार

राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीकाठावरील गावांमधील नागरिकांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे सोळांकूर, पंडेेवाडी, सावर्डे, कासारपुतळे, मांगेवाडी, मोघर्डे, नरतवडे, सरवडे, गावांबरोबर अनेक गावांतील नागरिकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू आहे.

जुलाब, उलट्यांचा त्रास झालेल्यांवर सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, तर अनेकजण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. पिण्याच्या पाण्यातून हा त्रास होत असल्याचे प्रथमदर्शनी वाटते. त्यामुळे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे वैद्यकीय अधिकारी एस. एस. माळवदे यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटक राज्याच्या काही भागाला शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दूधगंगा नदीतून होतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दूधगंगा नदी मैली होत होत आहे. रसायनयुक्‍त पाण्याचा तवंग तसेच दूषित पाण्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून नदीकाठावरील अनेक गावांतील अनेक लोकांमध्ये गॅस्ट्रोसदृश आजाराची लक्षणे दिसत आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांवर उपचार करून सोडण्यात आले, तर काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र